तुम्हालाही वाहतूक दंडाचा 'हा' बनावट संदेश आला का? मग ही बातमी तुमच्यासाठी...

सामान्यांची फसवणूक करण्यासाठी चोरटे नवनवी शक्कल लढवत असतात. सायबर चोरट्यांनी आता वाहतूक नियमभंग दंडाचा बनावट संदेश तयार केला असून, तो समाजमाध्यमात प्रसारित केल्याचे उघडकीस आले आहे. वाहनचालकांनी अशा संदेशास प्रतिसाद देऊ नये, तसेच चोरट्यांपासून सावध रहावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Thu, 31 Aug 2023
  • 03:43 pm
 traffic fine fake message

संग्रहित छायाचित्र

प्रतिसाद न देण्याचे वाहतूक पोलिसांचे नागरिकांना आवाहन

सामान्यांची फसवणूक करण्यासाठी चोरटे नवनवी शक्कल लढवत असतात. सायबर चोरट्यांनी आता वाहतूक नियमभंग दंडाचा बनावट संदेश तयार केला असून, तो समाजमाध्यमात प्रसारित केल्याचे उघडकीस आले आहे. वाहनचालकांनी अशा संदेशास प्रतिसाद देऊ नये, तसेच चोरट्यांपासून सावध रहावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

समाजमाध्यमातील ओळखीतून भेटवस्तू पाठविण्याचे आमिष, स्वस्तात दुचाकी, गृहोपयोगी वस्तू विक्री, ऑनलाइन टास्क, नोकरीचे आमिष दाखवून चोरटे नागरिकांना जाळ्यात ओढतात. गेल्या काही वर्षांपासून सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवरील थकीत दंडाचे प्रमाण मोठे आहे. चोरट्यांनी नेमकी ही बाब हेरून आता वाहतूक नियमभंग दंडाचा बनावट संदेश प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे. वाहतूक नियमभंग दंडाच्या संदेशात सायबर चोरट्यांनी एक लिंक पाठविली आहे. या लिंकमधील शब्दात फेरफार केला आहे. अशा संदेशाला प्रतिसाद दिल्यास फसवणूक होण्याची शक्यता आहे.

याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर म्हणाले, ‘थकीत दंडाचा अधिकृत संदेश पोलिसांकडून पाठविण्यात येतो. या संदेशात छायाचित्र नसते. चोरट्यांनी संदेशात लिंक पाठविली आहे. या लिंकमधील शब्दात फेरफार केला आहे. याबाबतची माहिती सायबर गुन्हे शाखेला कळविण्यात आली आहे.असे प्रकार आढळून आल्यास त्वरीत पोलिसांकडे तक्रार द्यावी."सायबर चोरटे वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवून नागरिकांची फसवणूक करतात. समाजमाध्यमातील संदेशावर विश्वास ठेऊ नये, असे सायबर गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे-पाटील यांनी नमूद केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest