चतुःश्रृंगी परिसरात पुन्हा टोळक्यांची दहशत, वाहनांची केली तोडफोड

पुण्यात पुन्हा एकदा टोळक्यांनी दहशत पसरवल्याचा प्रकार समोर आला आहे. पाच ते सहा जणांच्या टोळक्यांनी चतुःश्रृंगी परिसरातील जुनी वडारवाडी येथील वाहनांवर दगडफेक आणि तोडफोड केली आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Sat, 3 Jun 2023
  • 05:29 pm
Chathushringi police : चतुःश्रृंगी परिसरात पुन्हा टोळक्यांची दहशत, वाहनांच्या केली तोडफोड

संग्रहित छायाचित्र

पोलीसांनी सहा जणांविरोधात केला गुन्हा दाखल

पुण्यात पुन्हा एकदा टोळक्यांनी दहशत पसरवल्याचा प्रकार समोर आला आहे. पाच ते सहा जणांच्या टोळक्यांनी चतुःश्रृंगी परिसरातील जुनी वडारवाडी येथील वाहनांवर दगडफेक आणि तोडफोड केली आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवि ओरसे (वय ४२, रा. जुनी वडारवाडी, पुणे) यांनी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुनी वडारवाडी येथील गोलंदाज चौकातील बसवेश्वर मठाजवळ टोळक्यांनी बेकायदेशीरपणे जमाव जमवला. त्यानंतर काही एक कारण नसताना या ठिकाणी पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली. यावेळी त्यांनी लोखंडी हत्यार आणि दांडक्यांनी वाहनांच्या काचा फोडल्या.

या प्रकरणी रवि ओरसे यांनी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलीसांनी सहा जणांविरोधात कलम १४१, १४३, १४४, १४८, १४९, ३३६, ४२७, महा.पो.अधि.कलम ३७(१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास चतुःश्रृंगी पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest