दहीहंडीत धक्का लागल्यावरून तीक्ष्ण हत्याराने वार

दहीहंडी पाहत असताना धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले आहे. ही घटना सिंहगड कॉलेज कॅम्पस मध्ये असलेल्या एमबीएन कॉलेज समोररील सार्वजनिक रस्त्यावर घडली. भारती विद्यापीठ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Fri, 8 Sep 2023
  • 10:03 am
Pune Crime News

Pune Crime News : दहीहंडीत धक्का लागल्यावरून तीक्ष्ण हत्याराने वार

पुणे : दहीहंडी पाहत असताना धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले आहे. ही घटना सिंहगड कॉलेज कॅम्पस मध्ये असलेल्या एमबीएन कॉलेज समोररील सार्वजनिक रस्त्यावर घडली. भारती विद्यापीठ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

प्रवीण लोंढे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ध्रुव विश्वास लंकेश्वर (वय १९, रा. तानाजी नगर, धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. ध्रुव आणि त्यांचा मित्र सुजल जाधव असे दोघेजण सिंहगड कॉलेज कॅम्पसमध्ये असलेल्या एनबीएन कॉलेज समोरील सार्वजनिक रस्त्यावर दहीहंडी पाहण्यासाठी गेलेले होते. दहीहंडी उत्सवाचा कार्यक्रम संपल्यानंतर हे दोघेजण घरी जात होते.

त्यावेळी सुजल याला आरोपी लोंढे याचा धक्का लागला. त्याने सुजल याला शिवीगाळ करून मारहाण करायला सुरुवात केली. त्या दोघांची भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या ध्रुव याला आरोपीने मारहाण करीत धारदार शस्त्रने त्याच्या बरगडीवर वार करून जखमी केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest