किरकोळ वादाचा बदला घेण्यासाठी सोसायटी सेक्रेटरीने केली काळी जादू

किरकोळ कारणावरून वाद झाल्याने त्याचा बदला घेण्यासाठी गृहनिर्माण  सोसायटीचा सेक्रेटरी व त्याच्या मुलाने सोसायटीत राहणार्‍या एका कुटूंबावर तंत्रमंत्राच्या सहाय्याने काळी जादू केल्याचा प्रकार समोर आला आहे. कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये हा प्रकार घडला असून यासंदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

black magic, crime news

संग्रहित छायाचित्र

कोंढव्यातील पिकासो पॅराडाईजमधील धक्कादायक प्रकार, अगरवाल कुटुंबाला मानसिक धक्का 

किरकोळ कारणावरून वाद झाल्याने त्याचा बदला घेण्यासाठी गृहनिर्माण  सोसायटीचा सेक्रेटरी व त्याच्या मुलाने सोसायटीत राहणार्‍या एका कुटूंबावर तंत्रमंत्राच्या सहाय्याने काळी जादू केल्याचा प्रकार समोर आला आहे. कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये हा प्रकार घडला असून यासंदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.रुपेश अगरवाल असे तक्रारदाराचे नाव आहे. सोसायटीचा सेक्रेटरी राजकुमार जोशी आणि त्यांचा मुलगा अंकुर जोशी (रा. पिकासो पॅराडाईज अपार्टमेंट, सह्याद्री पार्क, साळुंखे विहार, कोंढवा) यांच्या विरोधात जादूटोणा प्रतिबंध कायदा ३ (२) यांसह भा. दं. सं कलम २९४,५००,५०४, ५०६, ३४ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोंढवा पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार रुपेश अगरवाल आणि सोसायटीचे सेक्रेटरी राजकुमार जोशी, मुलगा अंकुर जोशी हे तिघेही पिकासो पॅराडाईज अपार्टमेंट, सह्याद्री पार्क, साळुंखे विहार, कोंढवा येथे राहतात. तक्रारदार रुपेश अगरवाल व त्यांचे वडील राजेंद्र अगरवाल १४ मार्च २०२४ रोजी सकाळी स्वतःच्या गाडीतून ऑफिसला जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी सोसायटीचे गेट उघडण्यासाठी वॉचमन हजार नव्हता. त्यावेळी रुपेश अगरवाल हे सेक्रेटरी राजकुमार जोशी यांच्याकडे वॉचमन गेटवर का नाही? हे विचारण्यासाठी गेले होते. त्यावर वॉचमन माझी गाडी धुण्यासाठी दुसर्‍या सोसायटीमध्ये गेल्याचे त्यांनी सांगितले. यावर जोशी यांना ’वॉचमनला तुम्ही वैयक्तिक कामासाठी का पाठवता’? असे विचारल्याचा राग मनात धरून अंकुर जोशी याने तक्रारदार व त्यांच्या वडिलांना शिवीगाळ करून तुम्हा दोघांना बघुन घेतो अशी धमकी दिली आहे. त्यांच्या विरुध्द खोटा गुन्हा दाखल केला. तसेच तक्रारदार व त्याच्या कुटूंबीयांना मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने अंकुर जोशी याने काळी जादू करण्याच्या उद्देशाने वेळोवेळी गेटवर लिंबु ठेवून, स्वस्तिकवर काळी बाहुली जाळुन जादुटोणा केला आणि अगरवाल यांच्या कुटुंबियांच्या मनात भिती निर्माण केली. या प्रकरणाचे साक्षीदार स्वतः तक्रारदार व त्यांची आई आहे. तसेच तक्रारदारांचे मोठे भाऊ राकेश अगरवाल व मामा किशनचंद अगरवाल यांचा, माझे कुटुंबियांचा वेळोवेळी पाठलाग करुन दहशत निर्माण केली आहे. दरम्यानच्या काळात तक्रारदारांचे मोठे भाऊ राकेश अगरवाल यांना मानसिक त्रासामुळे हृदयविकाराचा झटका आला आहे. या पार्श्वभूमीवर सेक्रेटरी राजकुमार जोशी आणि त्यांचा मुलगा अंकुर जोशी यांच्या विरोधात कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest