Pune Crime News : आईच्या मैत्रिणींना पाठवले पॉर्न व्हिडीओ; तरुणाविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

एका तरुणाने स्वतःच्या आईच्याच दोन मैत्रिणींच्या मोबाईलवर अश्लील आणि नग्नावस्थेतील पॉर्न फोटो (porn photo)आणि व्हिडिओ पाठवून त्यांचा विनयभंग केला. याप्रकरणी वारजे पोलिसांनी या मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Pune Crime News

संग्रहित छायाचित्र

पुणे : एका तरुणाने स्वतःच्या आईच्याच दोन मैत्रिणींच्या मोबाईलवर अश्लील आणि नग्नावस्थेतील पॉर्न फोटो  (porn photo)आणि व्हिडिओ पाठवून त्यांचा विनयभंग केला. याप्रकरणी वारजे पोलिसांनी या मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २५ नोव्हेंबर पासून ८ डिसेंबर दरम्यान मोबाईल द्वारे घडला. (Pune Crime News)

आकाश सुनील शहाणे (Akash Sunil Shahane) (रा.पाचारणे वाडा,कसबा पेठ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे असे नाव आहे. याप्रकरणी ४० वर्षीय महिलेने  फिर्यादी आहेत. ही महिला कर्वेनगर परिसरात राहते. आरोपी आकाशची आई आणि फिर्यादी महिला मैत्रिणी आहेत. आकाशने त्याच्या मोबाईलवरून या महिलेच्या मोबाईलवर स्त्री-पुरुषांचे नग्न अवस्थेतील फोटो आणि पॉर्न व्हिडिओ असलेले मेसेज पाठवले. त्यांना मोबाईलवर शिवीगाळ केली.

यासोबतच त्यांच्या आणखी एका मैत्रिणीला देखील अशाच पद्धतीने अशी मेसेज पाठवले. त्यांना वारंवार फोन करून त्रास दिला आणि त्यांचा विनयभंग केला, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest