Lalit Patil Drug Case : ससून रुग्णालयाच्या डॉ. प्रवीण देवकाते याला अटक; डॉक्टरच्या अटकेने खळबळ

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामध्ये (Lalit Patil Drug Case) ससून रुग्णालयाच्या (Sassoon Hospitals) डॉ. प्रवीण देवकाते (Dr. Praveen Devkate) याला गुन्हे शाखेच्या पोलिसानी अटक केली आहे. ससूनचा शिपाई महेंद्र शेवते (Mahendra Shevate) याच्याकडे झालेल्या तपासात त्याचे नाव समोर आले होते.

Lalit Patil Drug Case

ससून रुग्णालयाच्या डॉ. प्रवीण देवकाते याला अटक

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात ससूनमधील डॉक्टरच्या अटकेने खळबळ

पुणे : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामध्ये (Lalit Patil Drug Case) ससून रुग्णालयाच्या (Sassoon Hospitals) डॉ. प्रवीण देवकाते (Dr. Praveen Devkate) याला गुन्हे शाखेच्या पोलिसानी अटक केली आहे. ससूनचा शिपाई महेंद्र शेवते (Mahendra Shevate) याच्याकडे झालेल्या तपासात त्याचे नाव समोर आले होते. शेवतेला अटक झाल्यानंतर डॉ देवकाते पसार झाला होता.

पोलीस ससून रुग्णालयातील बड्या अधिकाऱ्याचा शोध घेत होते.  ससून रुग्णालयाच्या ऑर्थोपेडीक विभागाचा प्रमुख म्हणून डॉ देवकाते काम करीत होता. ललीतची बडदास्त ठेवण्यात डॉ देवकाते देखील सामील होता. ललीतचे मेडिकल रिपोर्ट तयार करण्यापासून ते उपचारावर लक्ष ठेवण्यापर्यंत डॉ देवकते सहभागी होता. त्याला पहाटे अटक करण्यात आली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest