Sassoon Drugs Case : ससून ड्रग्ज प्रकरण : तीन महिन्यांपासून ललितचे सुरू होते 'प्लॅनिंग'; पळून जाताना त्याचा चालक होता सोबत

ड्रग्ज तस्कर ललित पाटील (Lalit Patil Drugs case) हा जेव्हा ससून रुग्णालयामधून (Sassoon Hospitals) पसार झाला तेव्हा त्याच्यासोबत त्याचा चालक सचिन वाघ (Sachin Wagh) (वय ३०) होता. त्याला गुन्हे शाखेने अटक केली आहे.

Sassoon Drugs Case

ससून ड्रग्ज प्रकरण : तीन महिन्यांपासून ललितचे सुरू होते 'प्लॅनिंग'

पुणे : ड्रग्ज तस्कर ललित पाटील (Lalit Patil Drugs case) हा जेव्हा ससून रुग्णालयामधून (Sassoon Hospitals) पसार झाला तेव्हा त्याच्यासोबत त्याचा चालक सचिन वाघ (Sachin Wagh) (वय ३०) होता. त्याला गुन्हे शाखेने अटक केली आहे. तसेच, ललित पाटीलला पुन्हा ताब्यात घेतले आहे. ललित आणि सचिन गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी ललितला सात दिवस आणि वाघ याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तब्बल तीन महिन्यांपासून पळून जाण्याचा 'प्लान' तयार करीत होता. तो पसार होत असताना त्याचा चालक त्याच्यासोबत होता, असे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. 

ललितसह त्याचा भाऊ भूषण पाटील, अभिषेक बलकवडे, एड. प्रज्ञा कांबळे, जानकी सुभाष मंडल, यांच्यासह अनेक आरोपींवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात अमली पदार्थ तस्करी आणि न्यायालयीन कोठडीत असताना ससून रुग्णालयातून पळून गेल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे  दाखल आहेत. ललितच्या पलायन प्रकरणात ललितसह त्याचा चालक सचिन वाघ याला बुधवारी (ता. २९) अटक करण्यात आली. या दोघांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. पोलिसांनी न्यायालयाला ललितच्या संपूर्ण प्लॅनची माहिती  दिली. ललित तीन महिन्यांपासून पळून जाण्याचा कट रचत होता. त्या कालावधीत वाघ पुण्यात आला होता. त्याला भेटण्यासाठी ललित दोन ते तीन वेळा ससून रुग्णालयातून बाहेर गेला होता असेही समोर आले आहे. 

सहायक सरकारी वकील नीलिमा यादव-इथापे यांनी युक्तीवाद करताना, ससून मधून पसार झालेल्या ललितसोबत वाघ देखील होता.  हे दोघेही पुण्यामधून परराज्यात सोबतच गेले. ललित पळून जाण्यापूर्वी तो वाघच्या संपर्कात होता. या कटात सहभागी होत पैसे आणि कारची मदत त्याने केली. युक्तिवाद करत गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी आरोपींनया पोलीस कोठडी देण्याची मागणी केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest