Crime News : पुराभिलेखागाराच्या आवारातून चंदनाची झाडे लंपास

विधान भवना समोर असलेल्या तसेच नवीन प्रशासकीय इमारतीला लागूनच असलेल्या १३५ वर्ष जुन्या पुराभिलेखागाराच्या आवारातून चंदनाची दोन झाडे कापून चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मंगळवारी उघडकीस आली.

Crime News : पुराभिलेखागाराच्या आवारातून चंदनाची झाडे लंपास

पुराभिलेखागाराच्या आवारातून चंदनाची झाडे लंपास

पुणे : विधान भवना समोर असलेल्या तसेच नवीन प्रशासकीय इमारतीला लागूनच असलेल्या १३५ वर्ष जुन्या पुराभिलेखागाराच्या आवारातून चंदनाची दोन झाडे कापून चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस चौकीपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पुराभिलेखागारामधून चंदनाची झाडे चोरीला गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

विधानभवनाच्या अगदी समोरच हे पुराभिलेखागार आहे. या पुराभिलेखागारामध्ये दररोज शेकडो नागरिकांची वर्दळ सुरू असते. या ठिकाणी जुने अभिलेख तपासण्याचे काम सुरू असते. या पुराभिलेखागारच्या आवारामध्ये चंदनाची झाडे आहेत. यातील दोन झाडे अज्ञात चोरट्याने कापून चोरून नेली. कर्मचाऱ्यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळापासून अगदी काही पावलांवरच बंडगार्डन पोलीस ठाण्याची कौन्सिल हॉल ही पोलीस चौकी आहे.

तसेच, बंडगार्डन पोलीस ठाणे देखील इथून जवळच आहे. सर्व प्रशासकीय कार्यालये आसपास असताना देखील या ठिकाणी चंदनाच्या झाडांची चोरी झाल्यामुळे सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पुढील तपास बंडगार्डन पोलीस करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest