Sale of whale vomit : पुण्यात गुडलक हॉटेलच्या मागे तब्बल पाच कोटी किंमतीच्या व्हेल माशाच्या उलटीची विक्री, आरोपीस अटक
पुणे : पाच कोटी रुपये किंमतीच्या व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास डेक्कन पोलीसांनी जेरबंद केले. विश्वनाथ रतन गायकवाड ( वय ३८, रा.४६९/९ कात्रज,खोपडे नगर, गुजरवाडी) याला अटक करण्यात आली आहे.
डेक्कन पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सचिन गायकवाड यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की. गुडलक हॉटेलचे मागे एक इसम व्हेल माशाची उलटी बेकायदेशीररित्या विक्री करीत आहेत. या बातमीची खात्री झाल्यने तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले यांनी वरीष्ठ पोलीस निरीक्षक विपीन हसबनिस यांना फोनव्दारे माहिती दिली. पोलिसांनी वनविभाग भांबुर्डीचे वनरक्षक कृष्णा आनंद हाके व पंचासह जाऊन गायकवाडकडे विचारणा केली. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्यांच्याकडे असलेल्या सॅकची तपासणी केली असता पाच कोटी रुपये किंमतीचा असलेली व्हेल माशाची उलटी सापडली.