Pune Crime News : धक्कादायक! सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाच्या अल्पवयीन नातीवर बलात्कार

सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाच्या (Retired Police Inspector) १५ वर्षीय अल्पवयीन नातीवर बलात्कार (Rape) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आरोपीने तिच्यासोबत अनैसर्गिक लैंगिक अत्याचार (Sexual assault) केल्याचे देखील निष्पन्न झाले आहे.

Pune Crime News

धक्कादायक! सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाच्या अल्पवयीन नातीवर बलात्कार

पुणे : सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाच्या (Retired Police Inspector) १५ वर्षीय अल्पवयीन नातीवर बलात्कार (Rape) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आरोपीने तिच्यासोबत अनैसर्गिक लैंगिक अत्याचार (Sexual assault) केल्याचे देखील निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस (Bharti Vidyapith Police) ठाण्यामध्ये आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही सर्व घटना भारती विद्यापीठ परिसरात १७ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर २०२३ या कालावधी दरम्यान घडली. (Pune Crime News) 

स्वप्निल शिरीष तवर (रा. कात्रज) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वप्निल तवर याने फिर्यादीच्या पंधरा वर्षीय अल्पवयीन नातीचा वारंवार पाठलाग केला. ती क्लासमध्ये जात असताना तिचा पाठलाग करून 'तू मला खूप आवडतेस' असे वारंवार म्हटले. सोसायटीच्या पार्किंगमधून तिला जबरदस्तीने टेरेसवर नेले. तिला मिठी मारून तिचे वारंवार चुंबन घेतले. तसेच तिला इन्स्टाग्रामवर मेसेज करून त्रास देण्यात आला. पीडित महिलेने त्याला मला मेसेज करू नको असे वारंवार म्हटल्यानंतर देखील त्याने तिला त्रास देणे सुरूच ठेवले.

आरोपीने तिला घरी बोलावून घेत स्वतःच्या बेडरूममध्ये नेले. जबरदस्तीने दिला कपडे काढायला लावत तिच्यावर  बलात्कार केला. तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. या संदर्भात कोणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी त्याने दिल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest