पिंपरी-चिंचवड : बांगलादेशी घुसखोरांनी काढलेले तब्बल ४२ भारतीय पासपोर्ट रद्द

बनावट कागदपत्रांच्या आधारे काढलेले ४२ भारतीय पासपोर्ट शासनाने रद्द केले आहेत. यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. यातील २३ घुसखोरांना पोलिसांनी अटक केली आहे.

Bangladeshi infiltrators

पिंपरी-चिंचवड : बांगलादेशी घुसखोरांनी काढलेले तब्बल ४२ भारतीय पासपोर्ट रद्द

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या पाठपुराव्याला यश, २३ घुसखोरांना केली अटक

बनावट कागदपत्रांच्या आधारे काढलेले ४२ भारतीय पासपोर्ट शासनाने रद्द  केले आहेत. यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. यातील २३ घुसखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. 

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवादविरोधी शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे साईनाथनगर, निगडी येथे अनधिकृतरित्या वास्तव्यास असणाऱ्या पाच बांगलादेशी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट काढून देणाऱ्या एजंटला अटक केली. एजंटकडे केलेल्या चौकशीत त्‍याने एकूण ४२ बांगलादेशी नागरिकांना पासपोर्ट काढून दिल्‍याचे समोर आले.

त्‍यामुळे निगडी पोलीस ठाण्‍यातील साहाय्यक निरीक्षक अंबरिश देशमुख यांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वतीने ४२ पासपोर्ट रद्द  करण्याबाबत प्रादेशिक पासपोर्ट ऑफिस, पुणे येथे पत्रव्यवहार करून कळविले होते. त्यानुसार प्रादेशिक पासपोर्ट ऑफिस, पुणे यांनी पडताळणी करून ४२ भारतीय पासपोर्ट रद्द केल्याबाबतचे आदेश २ जुलै रोजी काढले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त संदीप डोईफोडे, स्वप्ना गोरे, डॉ. शिवाजी पवार यांच्‍या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन लांडगे, दहशतवाद विरोधी शाखा, निगडी पोलीस ठाण्‍यातील तपास अधिकारी साहाय्यक निरीक्षक अंबरिष देशमुख यांच्‍या पथकाने केली आहे.

त्याशिवाय साधारणतः ६५ बांगलादेशी लोकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट काढल्याचे पिंपरी-चिंचवड दहशतवाद विरोधी शाखेने उघडकीस आणले आहे. त्यानंतर आवश्यक प्रक्रिया करून त्यातील ४२ पासपोर्ट रद्द करण्यात आले आहेत.पिंपरी-चिंचवड 

या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत २३ घुसखोरांना अटक केली आहे. त्याचा तपशील असा.

  भोसरी एमआयडीसी

निगडी

भोसरी

भोसरी एमआयडीसी

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest