विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या शिक्षकाला मनसेकडून चोप....

संगणकाचा तास सुरू असताना केवळ शर्ट व्यवस्थित इन केला नसल्याच्या कारणावरुन एका शिक्षकाने ११ वर्षीय विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Student, beaten ,by teacher, Teacher misconduct, schools, School discipline issues, Child abuse in education Improper dress code, punishment, Classroom violence against students, Teacher-student relationship concerns, Education ,student rights, School safety,discipline, Child protection in schools

संगणकाचा तास सुरू असताना केवळ शर्ट व्यवस्थित इन केला नसल्याच्या कारणावरुन एका शिक्षकाने ११ वर्षीय विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या विद्यार्थ्याच्या नाकांमधून आणि कानामधून  रक्तस्त्राव झाला. स्वारगेट पोलिसांनी या शिक्षकावर गुन्हा दाखल केला आहे. संदेश भोसले (वय २६) असे या शिक्षकाचे नाव आहे.

 याबाबत मुलाच्या वडिलांनी (वय ४४) स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार महर्षीनगर येथील सर ह्युम मॅक हेण्री हायस्कूलमध्ये घडला होता. याबाबत पालकांनी ‘मनसे’कडे धाव घेत आपली कैफियत मांडली. त्यानंतर, मनसेचे गणेश भोकरे यांनी पालक व कार्यकर्त्यांसह शाळेत धाव घेतली. याठिकाणी संबंधित शिक्षकाला चोप देण्यात आला. तसेच, तोडफोड देखील करण्यात आली. पुन्हा अशा घटना घडू नयेत याकरिता शाळेने खबरदारी घ्यावी. अन्यथा ‘मनसे’ स्टाईल धडा शिकवला जाईल असे भोकरे म्हणाले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest