पुणे : कर्वेनगरात खळबळ; अवघ्या २५ हजारांसाठी कामगाराने केली आत्महत्या; चाकूने घेतला गळा चिरून

ठेकेदाराकडून मित्राने हातउसणे घेतलेल्या २५ हजार रुपयांसाठी दिला जात असलेला मानसिक आणि शारीरिक त्रास असह्य झाल्याने कामगाराने आत्महत्या केली. स्वत:चा गळा चिरून आणि पोटावर वार करून घेत त्याने स्वत:चे जीवन संपवले.

Pune Crime News

पुणे : कर्वेनगरात खळबळ; अवघ्या २५ हजारांसाठी कामगाराने केली आत्महत्या; चाकूने घेतला गळा चिरून

पैशांसाठी त्रास देणारा ठेकेदार गजाआड

पुणे : ठेकेदाराकडून मित्राने हातउसणे घेतलेल्या २५ हजार रुपयांसाठी दिला जात असलेला मानसिक आणि शारीरिक त्रास असह्य झाल्याने कामगाराने आत्महत्या केली. स्वत:चा गळा चिरून आणि पोटावर वार करून घेत त्याने स्वत:चे जीवन संपवले. ही घटना वारजे येथे घडली. दरम्यान, वारजे पोलिसांनी कामगाराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ठेकेदाराला अटक केली आहे. 

रामविकास जयसिंग चौहान (वय २६, मूळ रा. राधिया देवरिया, जि. कुशीनगर, उत्तर प्रदेश) असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी सत्येंद्र राजपती चौहान (वय २६, सध्या रा. देशमुखवाडी, शिवणे, मूळ रा. कुशीनगर, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सत्येंद्र हा ठेकेदार आहे. तो रंगारी असून इमारतींना रंग देण्याच्या कामांचे ठेके घेतो. त्याच्याकडे रामविकास याच्यासह तीन ते चार कामगार काम करतात. रामविकासच्या मित्राने आरोपीकडून २५ हजार रुपये हातउसणे घेतले होते. हा मित्र देखील सत्येंद्रकडे काम करीत होता. त्याने उसणे घेतलेले पैसे परत केले नाहीत. तो काहीही न सांगता उत्तरप्रदेशला निघून गेला. त्यामुळे सत्येंद्रची चिडचिड सुरू झाली होती. त्याने ३० सप्टेंबर रोजी रात्री रामविकाससह आणखी दोन कामगारांना खोलीत कोंडून ठेवले. त्यांना मारहाण देखील केली. त्यावेळी रामविकास याने त्याच्या आईला फोन करून ही माहिती दिली. 

त्याची आई उत्तर प्रदेशात राहते. आरोपीने रामविकासकडे पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. त्याला पैशांवरून शिवीगाळ देखील केली. दरम्यान, मध्यरात्री रामविकास याने या त्रासाला कंटाळून स्वयंपाकघरातील चाकूने स्वत:च्या गळ्यावर चाकूने वार केले. तसेच, त्याने पोटावर देखील वार केले. अतिरक्तस्त्राव आणि गंभीर जखमी झाल्याने तो ग्लानीमध्ये गेला. दरम्यान, त्याच्यासोबतच्या अन्य कामगारांनी ही घटना पाहताच आरडाओरडा सुरू केला. रामविकासला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत पोलिसांना माहिती कळवण्यात आली. पोलिसांनी त्याचे मित्र आणि अन्य कामगार यांच्याकडे चौकशी केली. या चौकशीत सत्येंद्रच्या त्रासामुळे त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले. त्याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सचिन तरडे तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest