Pune Bopdev Ghat Gang Rape : सामूहिक बलात्कारप्रकरणी आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज; 'मिरर'च्या हाती एक्सक्लुजिव्ह दृश्य

बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडून तीस तास उलटून गेल्यानंतर देखील पोलिसांना आरोपींचा ठावठिकाणा लागलेला नाही. पुणे पोलिसांची जवळपास २५ पथके वेगवेगळ्या दिशेने या आरोपींचा शोध घेत आहेत.

Pune Bopdev Ghat Gang Rape

Pune Bopdev Ghat Gang Rape : सामूहिक बलात्कारप्रकरणी आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज; 'मिरर'च्या हाती एक्सक्लुजिव्ह दृश्य

पुणे : बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडून  तीस तास उलटून गेल्यानंतर देखील पोलिसांना आरोपींचा ठावठिकाणा लागलेला नाही. पुणे पोलिसांची जवळपास २५ पथके वेगवेगळ्या दिशेने या आरोपींचा शोध घेत आहेत. सीसीटीव्ही फुटेज , तांत्रिक डाटा याच्या मदतीने पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र मोबाईल फोनला रेंज नसलेला परिसर आणि तब्ब्ल दहा किलोमीटरपर्यंत सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांच्या तपासात अडचणी येत आहेत. 

दरम्यान, बोपदेव घाटाच्या सासवडच्या बाजूला तीन संशयित एक सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना आढळून आले आहेत.  त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटना घडल्यानंतर साधारण १५ मिनिटांनी हे संशयित पुढे जाऊन थांबले असावेत असा संशय आहे. 'मिरर'च्या हाती हे सीसीटीव्ही फुटेज लागलं असून त्याची ही एक्सक्लुजिव्ह दृश्य

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest