धमकावून जागा बळकवली; डॉक्टरवर गुन्हा

बेकायदा जागा बळकावून महिलेस जीवे मारण्याचे धमकी दिल्याप्रकरणी डॉ विजयकुमार आराध्ये, केदार आराध्ये, सुजित खुर्द,अर्जुन सलगर, सुजित कोरकेसह दहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

File Photo

बेकायदा जागा बळकावून महिलेस जीवे मारण्याचे धमकी दिल्याप्रकरणी डॉ विजयकुमार आराध्ये, केदार आराध्ये, सुजित खुर्द,अर्जुन सलगर, सुजित कोरकेसह दहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी सुजित खुर्द याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर  आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

एका ३४ वर्षाच्या महिलेने जुनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार त्यांची  नवी वेस परिसरात वडिलोपार्जित जागा आहे .त्या जागेत वेल्डिंगचे वर्कशॉप आहे .एकूण ९६०  फूट जागेपैकी ५९० फूट जागा फिर्यादीच्या नातेवाईकांनी विकली आहे. बाकीची राहिलेली जागा ही त्यांच्या मालकीची असून ताब्यात आहे.

२८  जुलै रोजी त्या जागेवरील पत्र्याचे शेड, पूजा हॉटेल व गुलमोहरचेे झाड पाडून आतील साहित्य चोरून नेले. ही बाब समजताच फिर्यादी महिला जागेवर गेल्या. त्यावेळी तेथे वरील संशयित आरोपी होते. त्यांच्याकडे विचारण केली असता अर्जुन सलगर यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest