पुणे: ‘एल थ्री’ बारमध्ये अमली पदार्थ सेवनप्रकरणी दोन तरुण ताब्यात

फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर असलेल्या लिक्विड लेझर लाउंज (एल थ्री) या बारमध्ये बेकायदा पार्टीत अमली पदार्थ सेवन करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी मंगळवारी (दि. २५) ताब्यात घेतले. या तरुणांनी बारमध्ये अमली पदार्थांचे सेवन केल्याची कबुली दिली आहे.

संग्रहित छायाचित्र

फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर असलेल्या लिक्विड लेझर लाउंज (एल थ्री)  L3 Drugs Party या बारमध्ये बेकायदा पार्टीत अमली पदार्थ सेवन करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी मंगळवारी (दि. २५) ताब्यात घेतले. या तरुणांनी बारमध्ये अमली पदार्थांचे सेवन केल्याची कबुली दिली आहे. 

नितीन नथुराम ठोंबरे (वय ३४, रा. १००५, हीना गौरव, गोकूळ धाम मार्केट, गोरेगाव पूर्व, मुंबई) आणि करण राजेंद्र मिश्रा (वय ३४, रा. फ्लॅट नं ३०२, सी विंग, गंगा आर्केड सोसायटी, पासपोर्ट ऑफिसजवळ, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. याव्यतिरिक्त सचिन विठ्ठल जाधव याच्यावर गुन्हा दाखल असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

या प्रकरणात ‘एल थ्री’ बारचा जागामालक, व्यवस्थापकांसह आठ जणांना अटक करण्यात आली. तसेच तेथील सहा कर्मचारीदेखील अटकेत आहेत. या पार्टीत सामील झालेल्या ४० ते ४५ जणांची पोलिसांनी चौकशी केली. पोलिसांनी आठ आरोपींपैकी तिघांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले होते. पार्टीत सामील झालेल्या काही जणांचे रक्ताचे नमुने पोलिसांनी ताब्यात घेतले होते. रक्त तपासणीचा अहवाल अद्याप पोलिसांना मिळालेला नाही. पार्टीत सहभागी झालेल्या दोन तरुणांची पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा त्यांनी अमली पदार्थांचे सेवन केल्याची कबुली दिली. बारमध्ये बेकायदा पार्टीचे आयोजन आरोपी अक्षय कामठे याने केले होते. पार्टीसाठी ऑनलाइन, तसेच रोख स्वरूपात शुल्क स्वीकारण्यात आले होते. पार्टीसाठी ऑनलाइन, तसेच रोख स्वरूपात शुल्क स्वीकारण्यात आले होते.  

रविवारी रात्रभर झालेल्या पार्टीत काही अल्पवयीन मुले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. बारमधील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी ‘सीविक मिरर’ला दिली.

दोघांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी

ठोंबरे आणि मिश्रा यांना मंगळवारी (दि. २५) न्यायालयात हजर करण्यात आले होते. पार्टीचे आयोजन करणारा कामठे, मद्य पुरविणारी व्यक्ती आणि अमली पदार्थ याबाबतची माहिती दोन्ही आरोपींना आहे. त्यामुळे त्यांच्याकडे या गुन्ह्यात सखोल तपास करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील प्रियांका वेंगुर्लेकर यांनी केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. एस. भाटिया यांनी आरोपींना शनिवारपर्यंत (दि. २९) पोलीस कोठडी सुनावली.

आरोपींकडे या मुद्यांचा होणार तपास

- व्हायरल व्हीडीओमध्ये दिसत असलेला अमली पदार्थ कोणता होता?

- ते अमली पदार्थ त्यांनी कोणाकडून घेतले?

- आरोपींनी तयार केलेले अमली पदार्थाचे डोस पार्टीमध्ये कोणाकोणाला विकले?

- अटक आरोपी आणि गुन्ह्यामध्ये यापूर्वी अटकेत असलेले आरोपी यांच्यात काय संबंध आहेत?

- या गुन्ह्यात कोणाला कशाप्रकारे बेकायदेशीर पैसे मिळाले ?

- आरोपींनी अमली पदार्थाचे सेवन केले आहे किंवा कसे याबाबत वैद्यकीय तपासणी करून अहवाल तयार करायचा आहे.

- आरोपींचे किती अल्पवयीन ग्राहक आहेत? त्यांनी आतापर्यंत किती अल्पवयीन मुलांना अमली पदार्थ दिले आहेत?

Pune Hotel Drugs Party Case

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest