चित्रपट पाहून बाहेर पडतात तरुणाचा खून
पुण्यात चाकूने वार करत तरुणाचा दहा ते बारा जणांनी मिळून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील शिवाजीनगर येथील मंगला चित्रपटगृहासमोर १५ ऑगस्ट रोजी रात्री एक वाजताच्या सुमारास घडली आहे. चित्रपट पाहून बाहेर पडताना या तरुणावर वार करण्यात आले आहेत.
नितीन मस्के असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. नितीन चित्रपट गृहातून बाहेर पडला. त्यावेळी त्याच्यावर चाकुने वार करण्यात आले होते. यामध्ये नितीन मस्के याचा जागीच मृत्यू झाला आहे. तलवार, चाकू आणि लोखंडी रॉड अशी हत्यारे घेऊन दहा ते बारा जणांनी घेरून मस्के याचा खून केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन म्हस्के याचा काही मुलांसोबत वाद झाला होता. या वादाच्या रागातून नितीनचा खून करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. १५ ऑगस्ट रोजी रात्री नितीन चित्रपट पाहायला गेला होता. चित्रपट गृहातून बाहेर पडल्यानंतर त्याचा खून करण्यात आला आहे. नितीनच्या खूनानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.