पुणे हादरले ! महावितरणच्या तरुण वरिष्ठ तंत्रज्ञाचा तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून

पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सिंहगड रोड येथील रायकर मळा परिसरात नीलायम टॉकीज समोर एका महावितरणच्या तरुण वरिष्ठ तंत्रज्ञाचा तीक्ष्ण शस्त्राने वार करत खून केला आहे. शहरात खूनाचे सत्र सुरूच असल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Mon, 4 Sep 2023
  • 04:35 pm
Pune Murder News

पुणे हादरले ! महावितरणच्या तरुण वरिष्ठ तंत्रज्ञचा तीक्ष्ण शस्त्राने वारकरून खून

पुणे : पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सिंहगड रोड येथील रायकर मळा परिसरात नीलायम टॉकीज समोर एका महावितरणच्या तरुण वरिष्ठ तंत्रज्ञाचा तीक्ष्ण शस्त्राने वार करत खून केला आहे. शहरात खूनाचे सत्र सुरूच असल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. याआधी परवा पुण्यातून खूनाची घटना समोर आली होती. गोपाळ कैलास मंडवे (वय- ३२ वर्षे राहणार ओवी अंगण कॉलनी जाधव नगर रायकर मळा, पुणे) असे खून करण्यात आलेल्या वरिष्ठ तंत्रज्ञाने नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज सोमवार (दि. 4) जोरी पावणे दोन वाजताच्या सुमारास मनोहर गार्डन जवळ खंडोबा मंदिर रोड रायकर मळा धायरी येथे एकाचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार गोपाळ याचा तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून केला. मात्र हा खून नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. याबाबत सिंहगड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत खूनाचा गुन्हा दाखल करून घेतला. पुढील तपास सिंहगड रोड पोलिस करत आहेत. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest