Pune Porsche Accident Case: वो कौन थी? - अल्पवयीन आरोपीला वाचविण्यासाठी आईनेच रक्त दिल्याची चर्चा असली तरी ही महिला नेमकी कोण होती?

अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी ससूनमधील डॉक्टरांनी मुलाऐवजी एका महिलेच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवल्याचे तपासात उघडकीस आले आहे. आता ही महिला कोण होती याचा अद्याप तपास लागलेला नाही. आम्ही या महिलेचा तपास करत असल्याची माहिती गुन्ह्याचे तपास अधिकारी असलेले साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयास दिली.

संग्रहित छायाचित्र

कल्याणीनगर पोर्शे दुर्घटनेतील अल्पवयीन आरोपीला वाचविण्यासाठी एका महिलेचे घेतले रक्त, आईनेच रक्त दिल्याची चर्चा असली तरी ही महिला नेमकी कोण होती याचा आता कसून शोध सुरू आहे

अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी ससूनमधील डॉक्टरांनी मुलाऐवजी एका महिलेच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवल्याचे तपासात उघडकीस आले आहे. आता ही महिला कोण होती याचा अद्याप तपास लागलेला नाही. आम्ही या महिलेचा तपास करत असल्याची माहिती गुन्ह्याचे तपास अधिकारी असलेले साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयास दिली. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी त्याच्या आईनेचे रक्त दिल्याची चर्चा आहे. मात्र, त्याला अजून दुजोरा मिळालेला नाही.  

 कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला तपासणीसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याच्या रक्ताचे नमुने हे सीसीटीव्ही कॅमेरा नसलेल्या ठिकाणी घेण्यात आले, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी गुरुवारी न्यायालयात दिली. रक्ताचे नमुने घेतलेल्या ठिकाणाचा पंचनामाही करण्यात आल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले. ज्या ठिकाणी मुलाचे रक्ताचे नमुने घेण्यात आले, त्या परिसरातील सीसीटीव्हीमध्ये डॉ. श्रीहरी हाळनोर आणि  घटकांबळे यांच्यासह काही साक्षीदार दिसून आले आहेत. डॉ. तावरे, डॉ. हाळनोर आणि घटकांबळे त्यांच्यामध्ये रक्ताचे नमुने घेण्याच्या वेळी विविध माध्यमांमधून संवाद झालेला आहे. तसा सीडीआरही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयास दिली.

कल्याणीनगर अपघात प्रकरणात (Kalyaninagar Accident Case) अल्पवयीन मोटारचालकाला वाचविण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि आपत्कालीन विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्यासह शिपाई अतुल घटकांबळे यांच्या पोलीस कोठीडत न्यायालयाने पाच जूनपर्यंत वाढ केली आहे. या गुन्ह्यातील कलमांमध्येही वाढ करण्यात आली आहे. 

रक्ताचे नमुने कोणाकडे दिले ?

अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी त्याच्या ऐवजी एका महिलेच्या रक्ताचे नमुने घेण्यात आल्याचे या प्रकरणात उघडकीस आले आहे.  मुलाचे नमुने डॉ. हाळनोर याने कचराकुंडीत फेकून न देता कुणाच्या तरी ताब्यात दिले आहे. हे नमुने नेमके कुणाच्या ताब्यात देण्यात आले, याचा पोलीस शोध घेत आहेत, असे सरकारी वकील नितीन कोंघे यांनी नमूद केले. 

आणखी संशयीतांना अटक 

कल्याणीनगर दुर्घटनेतील गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही आतापर्यंत अनेकांचे सीडीआर तपासले आहेत. त्यातील काही संशयित आरोपींची नावे निष्पन्न झालेली आहेत. त्यांच्या विरोधात सक्षम पुरावे मिळाल्यानंतर आम्ही त्यांना अटक करणार आहोत, अशी माहिती तांबे यांनी न्यायालयात दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest