रांजणगाव ‘एमआयडीसी’मधून २१ बांग्लादेशी ताब्यात
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बांग्लादेशी नागरिक (Bangladeshi citizens) वास्तव्य करीत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने रांजणगाव पोलिसांच्या मदतीने २१ बांग्लादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. यामध्ये १५ पुरुष, ४ महिला, दोन तृतीयपंथीयांचा समावेश आहे. हे सर्वजण रांजणगाव ओैद्योगिक वसाहत परिसरात (Ranjangaon MIDC) बेकायदा वास्तव्य करीत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडून बेकायदेशीर पद्धतीने तयार करण्यात आलेली कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना गुरुवारपर्यंत (२४ ऑक्टोबर) पोलीस कोठडी सुनावली.
अजमुल सरतखान उर्फ हसिफ खान (वय ५०), मोहम्मद अकबर अजीज अकबर सरदार (वय ३२) शफिकउल अलीमिया शेख (वय २०) हुसेन मुखिद शेख (वय ३०) तरिकुल अतियार शेख (वय ३८) मोहम्मद उमर फारूख बाबु उर्फ बाबु बुकतीयार शेख (वय ३२) शाहिन शहाजान शेख (वय ४४) मोहम्मद हुसेन शेख (वय ३२) रौफ अकबर दफादार (वय ३५) इब्राहिम काजोल शेख (वय ३५) फरीद अब्बास शेख (वय ४८) मोहम्मद सद्दाम अब्दुल सखावती (वय ३५) मोहम्मद अब्दुल हबीब रहेमान सरदार (वय ३२) आलीमिया तोहकील शेख (वय ६०) मोहम्मद इसराईल फकीर (वय ३५) फिरोजा मुताकीन शेख (वय २०) लिपोया हसमुख मुल्ला (वय ३२) सलमा मलौक रोशन मलीक (वय २३) हिना मुल्ला जुल्फीकार मुल्ला (वय ४०) सोनदिप उर्फ काजोल बासुदिप बिशेश (वय ३०) येअणुर शहदाता मुल्ला (वय २५, सध्या रा. कारेगाव, ता. शिरूर,, मुळ रा बांगलादेश) बांग्लादेशी नागरिकांची नावे आहेत. त्यांच्याकडे भारतात राहण्यासाठी लागणारी कागदपत्रे आढळून आली असून ही कागदपत्रे त्यांना कोणी दिली याचा तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले.
रांजणगाव ओैद्योगिक वसाहत परिसरातील कारेगावजवळ बांग्लादेशी नागरिक रहात असल्याची माहिती सहायक पोलीस फौजदार विशाल गव्हाणे यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि रांजणगाव पोलिसांनी दिली. त्यानुसार, कारेगाव परिसरात शोधमोहिम राबविण्यात आली. एका ठिकाणी हे सर्वजण भाडेतत्त्वार खोली घेऊन राहत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी याठिकाणी कारवाई करीत २१ बांग्लादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीमध्ये हे सर्व घुसखोर असल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडून मतदार कार्ड देखील जप्त करण्यात आले आहेत.