पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीसांची मोठी कारवाई; तब्बल ४२ सराईत गुन्हेगार हद्दपार

पुणे पोलीस लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलर्ट मोडवर गेल्याचे दिसून येत आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिमंडल पाचच्या अंतर्गत येणाऱ्या सात पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

Pune Crime News

संग्रहित छायाचित्र

पुणे : पुणे पोलीस लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलर्ट मोडवर गेल्याचे दिसून येत आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिमंडल पाचच्या अंतर्गत येणाऱ्या सात पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. शहरातील कोंढवा, वानवडी, मुंढवा, हडपसर, लोणी काळभोर, बिबवेवाडी तसेच मार्केटयार्ड या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या तब्बल ४२ सराईत गुन्हेगारांना हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ४ टोळी प्रमुखांचा समावेश असून या सर्वांना पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. (Pune Crime News) 

पुणे शहरात गेल्या काही दिवसात जबरी चोऱ्या,घरफोड्या,वाहन चोरी यासह वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपींनी धुमाकूळ घातला.याप्रकारची गुन्हेगारी ही उपनगराचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिमंडळ पाचमधील कोंढवा, मुंढवा, हडपसर, बिबवेवाडी, मार्केटयार्ड, वानवडी आणि लोणी काळभोर या भागात मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यामुळे सर्वाधिक मोठे कार्यक्षेत्र आणि गुन्हेगारी घटनांचा भाग म्हणून परिमंडळ पाचकडे पाहिले जाते. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीवृत्तीला आळा घालणे आणि प्रतिबंध करणेकामी पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील व सराईत गुन्हेगारांवर परिणामकारक व ठोस कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार परिमंडळ पाचमधील हडपसर विभाग व वानवडी विभागांचे अधिपत्याखाली येणाऱ्या वेगवेगळयां पोलीस ठाण्याकडील सराईत गुन्हेगारांची माहिती घेतली.  त्यावरून ४२ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. 

पुणे शहरातून तडीपार केल्यानंतर देखील अनेक सराईत शहरात वास्तव्य करीत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. पोलिसांच्या  कारवाईत हे तडीपार सापडतात. दरम्यान, तडीपार आरोपी शहरात आढळून आल्यास तात्काळ पोलीस नियत्रंण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest