पुणे: बेडशिट विक्रेत्याकडून १४ हजार रुपयांचा हप्ता घेतल्यानंतरही २३ बेडशिट घेणाऱ्या पोलिसांचे निलंबन

पुणे: रस्त्यावर बेडशिस्ट विक्रेत्याकडून १४ हजार रुपयांचा हप्ता घेतल्यानंतरही २३ बेडशिट घेणाऱ्या दोन पोलीस शिपायाना निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी केली.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुणे: रस्त्यावर बेडशिस्ट विक्रेत्याकडून १४ हजार रुपयांचा हप्ता घेतल्यानंतरही २३ बेडशिट घेणाऱ्या दोन पोलीस शिपायाना निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी केली. वंचित बहुजन सामाजिक संघाचे संस्थापक अध्यक्ष अमोल निकाळजे यांनी तक्रार दिल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नव्हती. त्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आता पोलिसांनी कारवाई  केली आहे. हा प्रकार १७ सप्टेबर रोजी विमाननगर येथे घडला होता. 

पोलीस अंमलदार सुनिल भगवान कुसाळकर आणि संजय महादेव आसवले अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस शिपायांची नावे आहेत. दोघेही विमानतळ पोलीस ठाण्यात नेमणूकीला होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्थमेश व त्याचे मित्र विमाननगर येथील दत्त मंदिर चौकात सर्व जण बेडशिट विक्रीसाठी थांबले होते. १७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता पोलीस शिपाई सुनिल कुसाळकर व संजय आसवले तेथे आले. तुम्ही का थांबलात इथे थांबायचे असेल तर हप्ता द्यावा लागेल, असे सांगून त्यांच्याकडील ६० बेडशिट स्कार्पिओ गाडीमध्ये टाकून निघून गेले. त्यानंतर विक्रेत्यांकडून त्यांनी १४ हजार रुपये हप्ता म्हणून घेतले. त्यानंतर अल्थमेश व त्यांचे मित्रांनी बेडशिटची मागणी केल्यानंतर त्यांनी ६० बेडशिटपैकी ३७ बेडशिट परत दिले. २३ बेडशिट स्वत:कडे ठेवून घेतले होते.

याबाबत वंचित बहुजन सामाजिक संघाचे संस्थापक अध्यक्ष अमोल निकाळजे यांनी विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय संकेश्वरी यांना १८ सप्टेंबर रोजी तक्रार अर्ज दिला होता. पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी त्या ठिकाणचे सीसीटीव्ही पाहून सर्वांचे जाब जबाब नोंदवून घेतले. तरीही विमानतळ पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे ३० सप्टेबर रोजी अमोल निकाळजे यांनी कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर आता पोलीस दलाच्या शिस्तीचे उल्लंघन करुन अशोभनीय असे बेशिस्त व बेजबाबदारपणाचे वर्तन केल्याने दोघांना पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी निलंबित केले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest