संग्रहित छायाचित्र
पुणे शहरात एक भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. २४ वर्षीय तरुणाने ५७ वर्षीय व्यक्तीचा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रिन्स प्रेमकुमार सिंग (वय-२४, रा. धानोरी, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाला दारू पाजून दारुच्या नशेत त्यांच्याशी अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. एवढंच नाही तर त्याचे अश्लील फोटो काढून ते नातेवाईक, ओळखीचे लोक व मित्र यांना पाठवून व्हायरल करण्याची धमकी दिली. आरोपीने फिर्यादीकडून नवीन मोटारसायकल व मोबाईलसह वेळोवेळी पैशाची देखील मागणी केली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.