पुणे : दिवे घाटात दुचाकीस्वारांना मारहाण करून लुबाडले

अहोरात्र वहातूकीची वर्दळ असलेल्या सासवड - हडपसर पालखी मार्गावर असलेल्या दिवे घाटात अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकीस्वारांना मारहाण करून त्यांच्याकडील किमती मोबाईल पळवून नेल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Amol Warankar
  • Wed, 24 Apr 2024
  • 02:41 pm
Pune Crime News

संग्रहित छायाचित्र

लोणी काळभोर : अहोरात्र वहातूकीची वर्दळ असलेल्या सासवड - हडपसर पालखी मार्गावर असलेल्या दिवे घाटात अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकीस्वारांना मारहाण करून त्यांच्याकडील किमती मोबाईल पळवून नेल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. रविवारी मध्यरात्री दोन व अडीच वाजण्याच्या सुमारास या घटना घडल्या आहेत. (Pune Crime News)

अमित गुप्ता व अभिषेक गुप्ता अशी मारहाण करून मोबाईल चोरून नेलेल्या  दुचाकीस्वारांची  नावे आहेत. याप्रकरणी दोघांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांचा विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित गुप्ता हे सासवड बाजूकडून हडपसर परिसराकडे दुचाकीवरून येत होते. यावेळी दोन वाजण्याच्या सुमारास दिवे घाटात अज्ञात चोरट्यांनी थांबवून जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या जवळ असलेला १३ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेह्ला. 

दुसऱ्या घटनेत रविवारी मध्यरात्री अभिषेक गुप्ता हे जेजुरी येथे दर्शनासाठी गेले होते. मध्यरात्री दोनच्या सुमारास हडपसरकडे येत होते. घाटातील वळणावर त्याच ठिकाणी चोरट्यांनी त्यांना अडवले. त्यांना धमकावून त्यांच्याजवळ असलेले २३ हजार रुपये किमतीचे मोबाईल संच चोरले. यावेळी चोरटे हे त्यांच्याजवळ असलेल्या दुचाकीवरून फरार झाले. तपास पोलिस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest