Pune Crime News : कंपनी चालकाने लाटली भविष्य निर्वाह निधीची रक्कम

मे आरअँडडी ऑटोमेशन प्रायव्हेट (ME R&D AUTOMATION PRIVATE LIMITED) लिमिटेड कंपनीमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनामधून कपात केलेली भविष्य निर्वाह निधीची (Provident Fund) रक्कम त्यांच्या खात्यात जमा न करता सहा लाख २५ हजार ७१६ रुपयांची फसवणूक (Fraud) करण्यात आली.

Pune Crime News

संग्रहित छायाचित्र

पुणे : मे आरअँडडी ऑटोमेशन प्रायव्हेट (ME R&D AUTOMATION PRIVATE LIMITED) लिमिटेड कंपनीमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनामधून कपात केलेली भविष्य निर्वाह निधीची (Provident Fund) रक्कम त्यांच्या खात्यात जमा न करता सहा लाख २५ हजार ७१६ रुपयांची फसवणूक (Fraud) करण्यात आली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhva Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मार्च २०१९ ते जुलै २०२२ पर्यंत घडला. (Pune Crime News)

याप्रकरणी कंपनीचे मालक निखिल लॉरेन्स दुबॉईस (वय ४०, रा. कोंढवा बुद्रुक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राहुल एकनाथ कोकाटे (वय ५१, रा. क्रीमसन क्रिस्ट सोसायटी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. दुबॉईस यांची आर अँड डी ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनामधून १८ लाख १ हजार ५२८ रुपयांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम कपात करण्यात आलेली होती. परंतु, यातील ११ लाख ७५ हजार ८१२ रुपये रक्कम जमा करण्यात आले. उर्वरित रक्कम जमा न करता फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest