'आरोपींविरुद्धचे पुरावे सिद्ध; जास्तीत जास्त शिक्षा द्यावी'

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींच्या विरोधातील पुरावे सिद्ध झालेले आहेत. त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी

Dr. Narendra Dabholkar Murder Case

संग्रहित छायाचित्र

नरेंद्र दाभोलकर यांच्या कुटुंबीयांची न्यायालयाकडे मागणी

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींच्या विरोधातील पुरावे सिद्ध झालेले आहेत. त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी दाभोलकर कुटुंबीयांनी न्यायालयाकडे केली आहे. याबाबतचे लेखी म्हणणे दाभोलकर कुटुंबीयांच्यावतीने ॲड. ओंकार नेवगी यांनी गुरुवारी (ता. २२) विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात सादर केले. (Dr. Narendra Dabholkar Case)

डॉ. दाभोलकर यांचा खून करण्यामागचा उद्देश काय होता? डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणाऱ्या आरोपींना दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी छायाचित्रासह न्यायालयात ओळखले आहे. तसेच डॉ. दाभोलकर यांचे शवविच्छेदन करणारे ससूनचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांनी सर्व माहिती न्यायालयात सांगितली आहे. आरोपी अंदुरे याने गुन्हा केल्याचा कबुली जबाब अतिरिक्त न्यायालयात दिला आहे. या सर्वांच्या आधारे आरोपींविरुद्ध अनेक पुरावे सिद्ध झाले आहेत, असे या अर्जात नमूद केले आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) वकिलांचा अंतिम युक्तिवाद संपल्यानंतर डॉ. दाभोलकर कुटुंबीयांच्यावतीने न्यायालयात लेखी म्हणणे सादर करण्यात आले.

आरोपींचे विश्लेषण विचारात घ्यावे

मानसशास्त्रीय मूल्यांकन करण्याच्या पुराव्याला देखील मूल्य आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने २०२३ साली दिलेल्या एका निकालात नमूद केले आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींचे मानसशास्त्रीय मूल्यांकन विचारात घेतले पाहिजे, अशी मागणीही अर्जात करण्यात आली आहे. एका मार्चला बचाव पक्षाच्यावतीने अंतिम युक्तिवाद सुरु होणार आहे. त्यापूर्वी आम्ही दोन महत्त्वपूर्ण न्यायनिवाड्याचे दाखले देणार आहोत, असेही ॲड. नेवगी यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest