पिंपरी चिंचवड: बाथरूममधील अ‍ॅसिड पिऊन विवाहितेची आत्महत्या

पती आणि दिराने विवाहीतेकडे पाच लाख रुपये हुंडा आणि चारचाकी गाडी माहेरहून आणण्याची मागणी करत तिचा छळ केला. पती आणि दिराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने बाथरूम मधील अ‍ॅसिड पिऊन आपले जीवन संपवले.

संग्रहित छायाचित्र

वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

पती आणि दिराने विवाहीतेकडे पाच लाख रुपये हुंडा आणि चारचाकी गाडी माहेरहून आणण्याची मागणी करत तिचा छळ केला. पती आणि दिराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने बाथरूम मधील अ‍ॅसिड पिऊन आपले जीवन संपवले. हा प्रकार ८ एप्रिल १०२४ रोजी श्रीनगर रहाटणी येथे घडला आहे.

पती राहुल मुन्ना पटेल (वय २७), दीर रोहित कुमार मुन्ना पटेल (वय २५, दोघे रा. श्रीनगर, रहाटणी. मूळ रा. उत्तर प्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी विवाहितेच्या २६ वर्षीय भावाने वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांच्या बहिणीकडे पाच लाख रुपये हुंड्याचे पैसे आणि चारचाकी गाडी घेण्यासाठी आठ ते दहा लाख रुपये माहेरहून आणण्याची मागणी केली. तसेच विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा १५ डिसेंबर २०२३ ते ८ एप्रिल या कालावधीत मानसिक व शारीरिक छळ केला. विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण ही करण्यात आली. पती राहुल आणि दीर रोहित यांच्या त्रासाला कंटाळून ८ एप्रिल रोजी विवाहितेने बाथरूम मधील ऍसिड पिऊन आत्महत्या केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest