मावळ लोकसभा मतदार संघात पुन्हा एकदा लाखो रुपयांची रोकड जप्त

बुधवारी (१ मे) निगडी भक्ती शक्ती चौक नजिक देहूरोड पोलीस आणि निवडणूक आयोगाने संयुक्तरीत्या उभारलेल्या नाकाबंदी दरम्यान २९.५० लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

Maval Lok Sabha Constituency

मावळ लोकसभा मतदार संघात पुन्हा एकदा लाखो रुपयांची रोकड जप्त

बुधवारी (१ मे) निगडी भक्ती शक्ती चौक नजिक देहूरोड पोलीस आणि निवडणूक आयोगाने संयुक्तरीत्या उभारलेल्या नाकाबंदी दरम्यान २९.५० लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

मर्सिडीज या आलिशान कार मधून ही रोकड जप्त करण्यात आली असून, आयकर विभागाच्या ताब्यात ही रोकड देण्यात आली आहे.

यापूर्वी उर्से टोल नाका येथे ५० लाख, वाकड पुलाखाली २७ लाखांची रोकड जप्त करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest