पुणे : गुन्हे शाखेनंतर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हेगारांची 'परेड'

गुन्हे शाखेच्या मार्गदर्शनाखाली आता सराईत गुन्हेगारांची पोलीस ठाणे स्तरावर 'परेड' घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. स्थानिक पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तसेच मागील पाच वर्षात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यास पोलिसांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरुवात करण्यात आली आहे.

Pune Crime News

गुन्हे शाखेनंतर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हेगारांची 'परेड'

पुणे : गुन्हे शाखेच्या मार्गदर्शनाखाली आता सराईत गुन्हेगारांची पोलीस ठाणे स्तरावर 'परेड' घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. स्थानिक पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तसेच मागील पाच वर्षात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यास पोलिसांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरुवात करण्यात आली आहे. (Pune Crime News)

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे आयुक्त म्हणून पदभार घेताच आयुक्तालयात सराईतांची 'हजेरी' घेतली होती. त्यांना गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर, सुनील तांबे आणि सहकारी अधिकाऱ्यांनी गुन्हेगारांना त्यांची जागा दाखवली होती. त्यानंतर आता हा पॅटर्न त्यांनी पोलीस ठाणे स्तरावर राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest