पिंपरी-चिंचवड : भीमा नदीकाठावरील दारूभट्टीवर पोलिसांचा छापा; पाच हजार लिटर कच्चे रसायन आणि ३१५ लिटर हातभट्टीची दारू नष्ट

खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथे भीमा नदीच्या काठावर सुरु असलेल्या एका दारूभट्टीवर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट तीनने छापा मारून कारवाई केली. या कारवाई मध्ये पोलिसांनी पाच हजार लिटर दारू बनवण्याचे कच्चे रसायन आणि ३१५ लिटर तयार दारू नष्ट केली.

Pimpri Chinchwad Crime

भीमा नदीकाठावरील दारूभट्टीवर पोलिसांचा छापा; पाच हजार लिटर कच्चे रसायन आणि ३१५ लिटर हातभट्टीची दारू नष्ट

खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथे भीमा नदीच्या काठावर सुरु असलेल्या एका दारूभट्टीवर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट तीनने छापा मारून कारवाई केली. या कारवाई मध्ये पोलिसांनी पाच हजार लिटर दारू बनवण्याचे कच्चे रसायन आणि ३१५ लिटर तयार दारू नष्ट केली. ही कारवाई बुधवारी (१ मे) दुपारी दोन वाजता करण्यात आली. (Pimpri Chinchwad Crime) 

राहुल राजपूत, प्रद्युम्न राठोड (दोघे रा. शेलपिंपळगाव, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार सुधीर दांगट यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बेकायदेशीरपणे भीमा नदीच्या काठावर दारूभट्टी लावली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट तीनने दारूभट्टीवर छापा मारून कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी एक लाख रुपये किमतीचे पाच हजार लिटर कच्चे रसायन आणि १५ हजार ७५० रुपये किमतीची ३१५ लिटर तयार दारू नष्ट केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest