पिंपरी-चिंचवड हादरले : भर दिवसा काळेवाडी फाट्यावर सराईत गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून

दगडाने ठेचून एका सराईत गुन्हेगाराचा खून करण्यात आला. ही घटना बुधवारी (दि. 1) भर दिवसा काळेवाडी फाटा येथे घडली. रीहान शेख (रा. जुनी सांगवी) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

Pimpri Chinchwad Murder

संग्रहित छायाचित्र

दगडाने ठेचून एका सराईत गुन्हेगाराचा खून करण्यात आला. ही घटना बुधवारी (दि. 1) भर दिवसा काळेवाडी फाटा येथे घडली. रीहान शेख (रा. जुनी सांगवी) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. 

याबाबत माहिती अशी की, बुधवारी रीहान शेख याच्यावर काही जणांनी हल्ला केला. काळेवाडी फाटा येथे त्याचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला आहे. रीहान शेख याच्यावर पिंपरी चिंचवड शहरात वेगवेगळे गुन्हे आहेत. पूर्ववैमानस्यातून त्याचा खून झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest