पुणे: रेल्वे स्थानक परिसरातून अपहरण झालेल्या बाळाची सुटका; बंडगार्डन पोलिसांची कर्नाटकात कारवाई

पुणे : पुणे रेल्वे स्थानक आवारामधून मध्यरात्री आईवडिलांसह झोपलेल्या सहा महिन्यांच्या बालकाचे अपहरण करण्यात आले होते. या बालकाची बंडगार्डन पोलिसानी कर्नाटक येथे कारवाई करीत सुटका केली असून आरोपीला अटक केली आहे.

रेल्वे स्थानक परिसरातून अपहरण झालेल्या 'त्या' बाळाची सुटका

पुणे : पुणे रेल्वे स्थानक आवारामधून मध्यरात्री आईवडिलांसह झोपलेल्या सहा महिन्यांच्या बालकाचे अपहरण करण्यात आले होते. या बालकाची  बंडगार्डन पोलिसानी कर्नाटक येथे कारवाई करीत सुटका केली असून आरोपीला अटक केली आहे. 

चंद्रशेखर मालकाप्पा नलूगंडी (वय २४, रा. जांबगी, जि. विजापूर, कर्नाटक),  सुभाष पुत्तप्पा कांबळे (वय ५५, रा. लवंगी, दक्षिण सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत. श्रावण अजय तेलंग असे अपहरण झालेल्या बालकाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील अजय तेलंग बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. बंडगार्डन पोलिसांनी (Bundgarden Police) दिलेल्या माहितीनुसार, मुळचे भुसावळचे असलेले हे दाम्पत्य कौटुंबिक भेटीगाठी करण्यासाठी पुण्यात आले होते. फिर्यादी यांची सासू पुण्यात राहते. तिला भेटण्यासाठी ते पुण्यात आले होते. शनिवारी मध्यरात्री पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात तेलंग दाम्पत्य मुलासह झोपलेले असताना चोरट्याने त्यांचे बाळ उचलून नेले होते. जाग आल्यावर त्यांना बाळ दिसले नाही. त्यांनी परिसरात शोध घेतला मात्र, त्याचा शोध लागला नव्हता. (Pune Railway Station Kidnapping Case)

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest