लोणी काळभोर: स्थानिक गुन्हे शाखेकडून एक गावठी पिस्तुल आणि एक जिवंत काडतुसासह दोन आरोपी जेरबंद

लोणी काळभोर : पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने एक गावठी पिस्तुल आणि एक जिवंत काडतुसासह दोन आरोपी जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेकडून एक गावठी पिस्तुल आणि एक जिवंत काडतुसासह दोन आरोपी जेरबंद

लोणी काळभोर : पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने एक गावठी पिस्तुल आणि एक जिवंत काडतुसासह दोन आरोपी जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी अथर्व संदीप जाधव (वय १८ रा गोंधळे नगर, हडपसर, ता. हवेली) व विजय बाळकृष्ण नेटके (रा. देलवडी,  ता दौंड, जि पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. सोमवार (२९ एप्रिल) रोजी लोकसभा निवडणुक संदर्भाने पथक पेट्रोलिंग करत असताना सहजपूर फाटा (ता. दौंड) येथे एक इसम आपले कब्ज्यात गावठी पिस्तुल घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास मिळाली . 

सदर बातमीच्या अनुषंगाने सहजपूर येथे जाऊन सापळा रचून अथर्व जाधव याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला मागील बाजूस पँटच्या आत एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्टल मिळून आले. त्यास त्याबाबत विचारले असता त्याने सदरचे पिस्तुल हे त्याचा मित्र विजय नेटके याचे असल्याचे सांगितले त्यावरुन नेटके यास ताब्यात घेतले असून त्यांचेकडून एक गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल की रू ३५००० आणि एक जिवंत काडतुस की रू १०० असा एकूण ३५ हजार १०० रू किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वरील आरोपी विरुद्ध भा ह कायदा कलम ३ (२५) महा. पोलीस का कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीची वैद्यकीय तपासणी करुन पुढील तपास कामी यवत पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस उपनिरीक्षक  प्रदीप चौधरी, पोलीस हवालदार विजय कांचन, अतुल डेरे, अमोल शेडगे, धिरज जाधव यांनी केली आहे.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest