पिंपरी-चिंचवड : लहान मुलांचे भांडण; मोठ्यांमध्येच जुंपली

लहान मुलांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मोठ्यांमध्ये भांडणे होत एकमेकांना कोयत्याने व लाठीकाठीने मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी (२१ एप्रिल) जाधववाडी, चिखली येथे घडली. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Amol Warankar
  • Wed, 24 Apr 2024
  • 04:10 pm
Pimpri Chinchwad Crime

संग्रहित छायाचित्र

परस्पर विरोधात गुन्हे दाखल

लहान मुलांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मोठ्यांमध्ये भांडणे होत एकमेकांना कोयत्याने व लाठीकाठीने मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी (२१ एप्रिल) जाधववाडी, चिखली येथे घडली. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Pimpri Chinchwad Crime) 

इरफान मोहम्मद खान (वय ३४ रा.चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार समीउद्दीन उर्फ समसू झिनकू खान (वय १८), शहाबुद्दीन झिनकू खान (वय २३ रा.चिखली), उस्मान नशीबउल्ला खान (वय २०) या तिघांना चिखली पोलिसांनी अटक केली आहे. तसेच शमशुद्दीन खान, महिला आरोपी, कुतबुद्दीन खान,रियाज उद्दीन खान, आजार उद्दीन खान यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलाला समशुद्दीन खान याच्या लहान मुलाने मारले होते. याचा जाब विचारायला फिर्यादी व त्यांची बहीण गेली होती. यावेळी या वादाचे रुपांतरण भांडणात झाले व आरोपींनी एकत्र येत फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना कोयत्याने व लाकडी दांडक्याने मारहाण करत गंभीर जखमी केले. फिर्यादी देखील या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत.

याच्या परस्पर विरोधात शहाबुद्दीन झिनकू खान यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार इरफान खान, कमरान खान, वहीद खान, अल्ताफ तसवर आली, वसिम रईस खान, रिजवान मन्नोवरनुल्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अल्ताफ, वसीम आणि रिजवान यांना अटक केली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इरफान याची बहिण फिर्यादी यांच्या घरी आली. तिने लहान मुलांच्या खेळण्यावरून भांडण केले. याबाबत तिने आरोपी इरफान याला सांगितले. इरफान याने त्याच्या साथीदारांना घेऊन येत फिर्यादी आणि त्यांच्या भावाला काठी, पाईप, कोयत्याने मारून गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest