Pimpri Chinchwad: उर्से टोल नाका येथे ५० लाखांची रोकड जप्त

पिंपरी-चिंचवड पोलिसांना नाकाबंदी दरम्यान उर्से टोल नाका येथे एका जीप मध्ये ५० लाख रुपयांची रोकड आढळून आली आहे. संबंधित व्यक्तीकडे चौकशी केली असता त्याला या रकमेबाबत योग्य माहिती देता आली नसल्याने

संग्रहित छायाचित्र

पिंपरी-चिंचवड पोलिसांना नाकाबंदी दरम्यान उर्से टोल नाका येथे एका जीप मध्ये ५० लाख रुपयांची रोकड आढळून आली आहे. संबंधित व्यक्तीकडे चौकशी केली असता त्याला या रकमेबाबत योग्य माहिती देता आली नसल्याने रोकड जप्त करण्यात आली आहे.

तसेच याप्रकरणी निवडणूक आयोग, पोलीस आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जात आहे. मावळ लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीबाबत महायुती आणि महाविकास आघाडीने अद्याप अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यातच आता एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest