पिंपरी चिंचवड: अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

भरधाव वेगातील दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (१५ एप्रिल) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास मुंबई बेंगलोर महामार्गावर, बाणेर येथे घडली.

संग्रहित छायाचित्र

भरधाव वेगातील दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (१५ एप्रिल) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास मुंबई बेंगलोर महामार्गावर, बाणेर येथे घडली.

लक्ष्मीकांत बेचन विश्वकर्मा (वय ५४, रा. संचेती शाळेजवळ, थेरगाव) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्‍या दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस अंमलदार अविनाश उत्तम सगर यांनी मंगळवारी (१६ एप्रिल) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीकांत यांनी भरधाव वेगात दुचाकी चालविली. ते बाणेर येथे आले असता वाहतूकीच्‍या नियमांकडे दुर्लक्ष केल्‍याने त्‍यांची दुचाकी घसरून ते गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest