पिंपरी-चिंचवड : बनावट दस्त व घोषणापत्र सादर केल्याप्रकरणी बांधकाम व्यवसायिकावर गुन्हा दाखल

दस्त नोंदणी करताना बनावट दस्त व घोषणापत्र सादर केल्याप्रकरणी बांधकाम व्यवसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३० डिसेंबर २०१५ रोजी लांडेवाडी येथील दुय्य्म निबंधक कार्यालयात ही घटना घडली आहे. (

संग्रहित छायाचित्र

दस्त नोंदणी करताना बनावट दस्त व घोषणापत्र सादर  केल्याप्रकरणी बांधकाम व्यवसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३० डिसेंबर २०१५ रोजी लांडेवाडी येथील दुय्य्म निबंधक कार्यालयात ही घटना घडली आहे. (Pimpri Chinchwad Crime)

याप्रकरणी दुय्यम निबंधक कार्यालयातील महिला अधिकाऱ्याने भोसरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (१६ एप्रिल) फिर्याद दिली असून, आरोपी रतनलाल गुलाबचंद गुंदेशा (रा.  अलंकार सोसायटी, शंकर शेठ रोड, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने जमिनीचा दस्त नोंदविताना खोटे घोषणापत्र सादर करून बनावट दस्त करून त्यावेळच्या दुय्यम निबंधकाची फसवणूक केली आहे. ही बाब निदर्शनास येताच निबंधक कार्यालयातर्फे भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest