कोपर्डी बलात्कार प्रकरणातील पप्पू शिंदे याची येरवडा कारागृहात आत्महत्या
पुणे : पुण्यातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. कोपर्डी खटल्यातील मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे याने येरवडा कारागृहात आत्महत्या केली आहे. पप्पू शिंदे याने कारागृहात आज रविवार (दि.10) रोजी पहाटे सहा वाजता टॉवेलने गळफास घेत आयुष्याचा शेवट केला. दरम्यान सकाळी कारागृहात पोलीस कर्मचाऱ्यांना शिंदे याचा मृतदेह आढळला. पप्पूच्या आत्महत्येनंतर येरवडा कारागृहात एकच खळबळ उडाली.
महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपी शिंदे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. कोपर्डी येथील बलात्कार व खून प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून पप्पू कारागृहात शिक्षा भोगत होता. आज सकाळी त्याने येरवडा कारागृहात बराकमध्ये टॉवेलच्या सहाय्याने गळफास घेतला. दरम्यान पहाटे पोलिस गस्तीवर गेले असताना पोलिसांना शिंदेचा मृतदेह आढळून आला. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी कारागृहातील वरिष्ठ अधिकारी दाखल झाले.