Accident News : भरधाव डंपरने एकाला चिरडले

भरधाव डंपर ने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एका अज्ञात व्यक्तीला चाकाखाली चिरडल्याची घटना कोंढवा येथील टिळेकरनगरमधील महालक्ष्मी वॉशिंग सेंटरच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर घडली.

Accident News

संग्रहित छायाचित्र

पुणे : भरधाव डंपर ने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एका अज्ञात व्यक्तीला चाकाखाली चिरडल्याची घटना कोंढवा येथील टिळेकरनगरमधील महालक्ष्मी वॉशिंग सेंटरच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) गुन्हा दाखल करीत आरोपी चालकाला अटक केली आहे. मृताचे नाव मात्र समजू शकले नाही. (Accident news)

भरत गोपाळ चंदेवाड (वय ५०, रा. संभाजीनगर, कोंढवा) सासवड रोड असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार राजेंद्र पांडुरंग खामकर यांनी फिर्याद दिली आहे. चंदेवाड  हा डंपर चालक आहे. तो मंगळवारी डंपर घेऊन टिळेकर नगरच्या रस्त्याने जात होता. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या कडेला झोपलेल्या ३५ ते ४० वयोगटात दरम्यानच्या एका व्यक्तीला त्याने चाखाखाली चिरडले. या अपघातात या व्यक्तीचा जागी मृत्यू झाला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest