Crime : भरधाव बसच्या धडकेत एकाचा मृत्यू

भरधाव बसने एका पादचारी व्यक्तीला धडक दिली. त्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (१० डिसेंबर) दुपारी तीन वाजताच्या सुमारास चाकण-तळेगाव रस्त्यावर घडली.

Crime News

भरधाव बसच्या धडकेत एकाचा मृत्यू

भरधाव बसने एका पादचारी व्यक्तीला धडक दिली. त्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (१० डिसेंबर) दुपारी तीन वाजताच्या सुमारास चाकण-तळेगाव रस्त्यावर घडली.

बाबाजी रामभाऊ दौंडकर (Babaji Rambhau Daundkar) (वय ५५, रा. दौंडकरवाडी, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी प्रवीण बाबाजी दौंडकर (Praveen Babaji Daundkar) (वय ३०) यांनी चाकण पोलीस (Chakan Police) ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनील सोपान घाटे (वय ३७, रा. लांडेवाडी, भोसरी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील बाबाजी दौंडकर हे चाकण-तळेगाव रत्याने चालत जात होते. त्यावेळी आरोपी सुनील घाटे त्याच्या ताब्यातील बस भरधाव वेगात चालवत आला. भरधाव बसने बाबाजी यांना धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest