Pune Crime News : पत्नीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, पतीकडून तरुणाचा खून

पत्नीबद्दल आक्षेपढ वक्तव्य केल्यामुळे चिडलेल्या पतीने तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. ही घटना नर्हे येथील स्वामीनारायण मंदिराच्या पाठीमागील डोंगराच्या पायथ्याला घडली.

Pune Crime News : पत्नीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, पतीकडून तरुणाचा खून

पत्नीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, पतीकडून तरुणाचा खून

पुणे : पत्नीबद्दल आक्षेपढ वक्तव्य केल्यामुळे चिडलेल्या पतीने तरुणाच्या डोक्यात दगड (Pune Crime News) घालून त्याचा खून केला. ही घटना नर्हे येथील स्वामीनारायण मंदिराच्या पाठीमागील डोंगराच्या पायथ्याला घडली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police) आरोपीला अटक केली आहे.

सौरभ रुपेश शिंदे (Saurabh Rupesh Shinde) (वय २३, रा. राम मंदिर लेन नंबर २आंबेगाव पठार) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अनिकेत मुकुंद परदेशी (वय २८, रा. अभिनव कॉलेज रोड, नंदनवन सिटी) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी रुपेश नामदेव शिंदे (वय ४९) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश शिंदे यांचा मुलगा सौरभ आणि अनिकेत हे दोघेही एकमेकांचे मित्र होते. अनिकेत याच्या घरी सौरभ हा १९ नोव्हेंबर रोजी रविवारी जेवण करण्यासाठी गेला होता.

घरामध्ये जेवण करत असताना सौरभने अनिकेतच्या पत्नीबद्दल अपशब्द उच्चारले. त्याचा राग अनिकेतला अनावर झाला. त्याने सौरभला गोड बोलून डोंगरा जवळ नेले आणि त्याला तिथे मारहाण केली. त्याच्या डोक्यावर तोंडावर दगडाचे घाव घालून त्याला ठार मारले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest