Pune Crime News : सख्ख्या भाच्याने आत्याविरुद्ध केली अश्लील पोस्ट

सख्या भाच्याने डॉक्टर असलेल्या आत्यासंदर्भात इंस्टाग्राम अकाउंटवर अश्लील फोटो आणि पोस्ट टाकून विनयभंग केला. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Yerawada Police) भाच्या विरोधात भादवि कलम ३५४,३५४(अ), ५००, ५०९ यासह आयटी ॲक्ट ६७ अनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Pune Crime News

संग्रहित छायाचित्र

पुणे : सख्या भाच्याने डॉक्टर असलेल्या आत्यासंदर्भात इंस्टाग्राम अकाउंटवर अश्लील फोटो आणि पोस्ट टाकून विनयभंग केला. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Yerawada Police) भाच्या विरोधात भादवि कलम ३५४,३५४(अ), ५००, ५०९ यासह आयटी ॲक्ट ६७ अनुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १५ नोव्हेंबर रोजी रात्री घडला. (Pune Crime News)

याप्रकरणी ५८ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही महिला महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड येथे राहण्यास आहे. ती व्यवसायाने डॉक्टर आहे. तर, आरोपी हा त्यांच्या भावाचा मुलगा आहे. तो सध्या गुजरात येथील वापी या ठिकाणी राहतो. त्याने त्याच्या इंस्टाग्राम आयडीवरून फिर्यादी महिलेच्या विरुद्ध अश्लील फोटो आणि पोस्ट टाकून व्हायरल केली. त्यांची समाजामध्ये बदनामी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest