Pune Crime : बिबवेवाडी परिसरात महिलेचा खून

महिलेच्या चेहऱ्यावर कोणत्यातरी कठीण वस्तूने मारहाण करून खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना बिबवेवाडी परिसरातील गंगाधाम चौकात गोयल गार्डनसमोर घडली. (Pune Crime News)

Pune Crime

संग्रहित छायाचित्र

पुणे: महिलेच्या चेहऱ्यावर कोणत्यातरी कठीण वस्तूने मारहाण करून खून (Murder)  केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही  घटना बिबवेवाडी परिसरातील गंगाधाम चौकात गोयल गार्डनसमोर घडली. (Pune Crime News)

याप्रकरणी पोलिस हवालदार गजानन खंडाळे यांनी बिबवेवाडी पोलिस (Bibvewadi Police) ठाण्यात फिर्याद दिली आहे. गंगाधाम चौक परिसरात गोयल गार्डनजवळ जय संतोषी माँ आयुर्वेदिक कॅम्प नावाने कापडी तंबू आहे. शनिवारी सकाळी या तंबूत एक महिला मृतावस्थेत आढळल्याची माहिती बिबवेवाडी पोलिसांना मिळाली. 

 महिलेच्या चेहऱ्यावर कठीण वस्तूने मारहाण केल्याचे दिसून येत आहे. खून झालेल्या महिलेचे वय सुमारे ४० ते ४५ वर्षे आहे. ही महिला आयुर्वेदिक औषधी विक्रीचा व्यवसाय करीत होती. अज्ञात व्यक्तीने तिच्या चेहऱ्यावर कठीण वस्तूने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. खून झालेल्या महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही.

पोलिसांनी मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी ससून रूग्णालयात पाठविला आहे. खुनामागचे कारण स्पष्ट झालेले नाही. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण काळुखे करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest