Pune Crime News : खळबळजनक! समलैंगिक संबंधातून तरुणाचा खून

समलैंगिक संबंधामधून (Homosexual relationship)तरूणावर कोयत्याने वार करीत त्याचा खून (Murder) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी संध्याकाळी वाघोली येथील बकोरी रस्त्यावर घडली.

Pune Crime News : खळबळजनक! समलैंगिक संबंधातून तरुणाचा खून

पुणे : समलैंगिक संबंधामधून (Homosexual relationship)तरूणावर कोयत्याने वार करीत त्याचा खून (Murder) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी संध्याकाळी वाघोली येथील बकोरी रस्त्यावर घडली. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police) गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे. (Pune Crime News)

महेश डोके (Mahesh Doke) (वय २१, सध्या रा. स्टुडेंट हॉस्टल, बीजीएस कॉलेज, वाघोली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ काईंगडे यांनी सांगितले, की महेश हा वाघोलीमधील बीजीएस कॉलेजमध्ये 'बीबीए'च्या शेवटच्या वर्षात शिकत होता. तो वाढेबोल्हाई येथे एका हॉस्टेलमध्ये राहत होता. तो मंगळवारी सायंकाळी बकोरी रस्त्यावरून जात होता. त्यावेळी त्याच्यावर कोयत्याने वार करून हल्ला करण्यात आला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महेशला पाहून तेथून जात असलेल्या एका नागरिकाने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली.

त्यानेच जखमीला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु, या रुग्णालयाने त्याला ससूनला हलविण्याची सूचना केली. त्याला ससूनला घेऊन जात असतानाच त्याचा वाटेतच मृत्यू झाला. दरम्यान, जखमी महेशने बेशुद्ध होण्यापूर्वी या मदत करणाऱ्या व्यक्तीला आपल्यावरील हल्ला प्रेम प्रकरणामधून झाल्याचे सांगितले होते. यासोबतच त्याने प्रियकर हल्लेखोराचे नाव सांगितले. त्याचे वर्णन देखील सांगितले होते. या वर्णनावरून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला असून आरोपीच्या शोधार्थ दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. लवकरच आरोपी ताब्यात येण्याची शक्यता असल्याचे काईंगडे यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest