Pune Murder News : पुण्यात अनैतिक संबंधातून खून

अनैतिक संबंधांबाबत (Pune) माहिती विचारल्यानंतर दोन मित्रांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसान थेट खून करण्यापर्यंत झाले. या प्रकरणी सिंहगड रोड (Sinhagad Road) पोलिसांनी १९ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. या घटनेत ४७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Fri, 20 Oct 2023
  • 03:26 pm
Pune Murder News :

संग्रहित छायाचित्र

अनैतिक संबंधांबाबत (Pune) माहिती विचारल्यानंतर दोन मित्रांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसान थेट खून करण्यापर्यंत झाले. या प्रकरणी सिंहगड रोड (Sinhagad Road) पोलिसांनी १९ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. या घटनेत ४७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. (Pune Crime)

विठ्ठल वसंत नवघणे (वय ४७, रा. धायरी) असे खून झालेल्याचे नाव आहे, तर पोलिसांनी संतोष तानाजी खाडे (वय १९, रा.  कांबळे चाळ, धायरी गाव) याला अटक केली आहे. या प्रकरणी सुनील वसंत नवघणे (वय ५२) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना धायरी येथील खंडोबा माळावर असलेल्या बानाई मळा या ठिकाणी घडली.

सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष खाडे आणि विठ्ठल नवघणे हे एकमेकांचे मित्र होते. विठ्ठल नवघणे हे एका कारखान्यात काम करायचे. तर खाडे हा फॅब्रिकेशनची कामे करतो. नवघणे यांचे एका महिलेसोबत मागील दहा वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते. ही महिला खाडे याच्याच घराजवळ राहण्यासाठी आहे. त्याने तिला बहीण मानलेले होते. खाडे याला त्यांच्यामधील संबंधांची माहिती मिळाली. त्याने विठ्ठल नवघणे याच्याकडे याबाबत चौकशी केली. 'या महिलेचे कोणासोबत लफडे आहे? ते तुला माहीत आहे. तू मला सांग' असे त्यांनी सांगितले. त्यावेळी विठ्ठल आणि त्याच्यामध्ये वाद झाला आणि या दोघांमध्ये हाणामारी झाली. त्यावेळी, नवघणे याने खाडे याला कानाखाली मारली होती आणि शिवीगाळ देखील केली होती. त्याचा राग धरून आरोपीने लोखंडी हत्याराने नवघणे याच्या डोक्यात सपासप वार करून त्याला ठार मारले. पोलिसांनी खाडे याला तत्काळ अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्याला २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक सचिन निकम करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest