Molestation : 'ती' ओरडत राहिली 'ते' मात्र थांबले नाहीत; रिक्षा चालकाकडून प्रवासी महिलेचा विनयभंग

वाघोली येथे डी-मार्ट मॉलमध्ये इंटरव्ह्यूसाठी गेलेल्या तरुणीचा रिक्षाचालकाने तिला जवळ ओढून घेत अश्लील स्पर्श करीत विनयभंग (molestation) केला. ही घटना वाघोली येथील रिलायन्स डिजीटल शॉपसमोर बुधवारी दुपारी घडली.

molestation

रिक्षा चालकाकडून प्रवासी महिलेचा विनयभंग

लोणीकंद पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू

पुणे : वाघोली येथे डी-मार्ट मॉलमध्ये इंटरव्ह्यूसाठी गेलेल्या तरुणीचा रिक्षाचालकाने तिला जवळ ओढून घेत अश्लील स्पर्श करीत विनयभंग (molestation) केला. ही घटना वाघोली येथील रिलायन्स डिजीटल शॉपसमोर बुधवारी दुपारी घडली. याप्रकरणी लोणीकंद पोलीस (Lonikand Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या तरुणीने आरडाओरडा करीत मदतीसाठी लोकांना आवाज दिला. मात्र, तिची मदत करायला कोणीही थांबले नाही.  (Pune Crime News) 

पोलिसांनी अज्ञात ऑटोरिक्षा चालकाविरुद्ध भादवि ३५४, ३५४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी खराडी येथे राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. लोणीकंद पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा सहा आसनी रिक्षा चालवतो. तो नगर रस्त्यावर 'शेअर सीट' घेऊन प्रवाशांची वाहतूक करतो. पिडीत तरुणी येरवडा येथील फिनिक्स मॉलमध्ये नोकरी करते. तीला वाघोली येथील डी-मार्ट मॉलमध्ये नोकरीसंदर्भात इंटरव्ह्यूसाठी जायचे होते. येरवडा ते वाघोली असा प्रवास केल्यानंतर तिने आरोपी रिक्षाचालकाला ऑनलाईन पेमेंट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे पेमेंट झाले नाही.

रिक्षा चालकाने तिला पैसे नका देऊ असे सांगितले. इंटरव्ह्यू संपल्यानंतर ही तरुणी पुन्हा येरवडा येथे जाण्यासाठी रिक्षा पहाट होती. त्यावेळी आरोपीची रिक्षा तिला दिसली. ती पुन्हा त्याच रिक्षात बसली. चालकाने तिला पुढे स्वत:च्या जवळ बसण्यास सांगितले. सर्व प्रवासी उतरल्यानंतर त्याने त्याची रिक्षा रिलायन्स डिजीटल शॉपजवळ घेतली. रस्त्याच्या कडेला रिक्षा उभी केल्यावर त्याने या तरुणीची मान पकडून स्वत:कडे खेचत चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. या तरुणीने आरडाओरडा करीत रिक्षामधून खाली उडी घेतली. मदतीसाठी लोकांना आवाज दिला. मात्र, तिच्या मदतीसाठी कोणीही थांबले नाही. त्याने पुन्हा तिला रिक्षात ओढून घेत अश्लील स्पर्श केले. पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest