संग्रहित छायाचित्र
सुरक्षारक्षकाने सोसायटीतील ११ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील सुसगाव येथील गार्डीनीया सोसायटीमध्ये १ जून रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीसांनी नराधम सुरक्षारक्षकाला अटक केली आहे.
राजकरण सुजा श्रीवास (वय ४६, रा. गार्डीनीया अपार्टमेंट, पारखेवस्ती चौक, सुसगाव, ता. मुळशी, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी नराधमाचे नाव आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गार्डीनीया अपार्टमेंटमधील सुरक्षा रक्षकाने ११ वर्षीय अल्पवयीन मुलीशी जवळीक निर्माण केली. त्यानंतर मुलीला लिफ्टमध्ये बसवून सोसायटीच्या टेरेसवर नेले. टेरेसवर नेवून मुलीसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिला किस केले. हा प्रकार लक्षात येताच पीडित मुलीच्या आईने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलीसांनी कलम ३५४, ३५४, ३४१, ३२३, पोस्को ८ आणि १० नुसार गुन्हा दाखल करत आरोपी राजकरण श्रीवासला अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.