Molestation : रिक्षाचालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

रिक्षा चालकाने एका सात वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग (molestation) केल्याची खळबळ जनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadpsar Police) रिक्षा चालकाला अटक केली आहे. (Pune Crime)

Molestation

रिक्षाचालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पुणे : रिक्षा चालकाने एका सात वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग (molestation) केल्याची खळबळ जनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadpsar Police) रिक्षा चालकाला अटक केली आहे. (Pune Crime)

राजू महादू पाटील (वय ५६, रा. निर्माण टाउनशिप, काळेपडळ, हपडसर) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या ४२ वर्षीय आईने फिर्याद दिली आहे. ही घटना आर्मी पब्लिक स्कूलच्या गेट समोर तसेच आरोपीच्या राहत्या घरी घडली. पीडित मुलीचे कुटुंबीय आणि आरोपी राजू पाटील यांची ओळख आहे. ते एकाच भागात राहण्यास आहेत. राजू पाटील हा रिक्षा चालक आहे.

पीडित मुलगी ही त्याच्या रिक्षामध्ये एकटी बसलेली असताना आरोपीने या मुलीचा हात घेऊन तो स्वतःच्या लैंगिक अवयवांना लावून तिचा विनयभंग केला. तसेच, संध्याकाळी तिला पुन्हा एकटे गाठून चॉकलेट देण्याच्या पाहण्याने घरी बोलावले. घरात तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. या संदर्भात कोणाला काहीही सांगू नये अशी धमकी त्याने दिल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest