Lalit Patil Case : ललित पाटील प्रकरणात ससूनच्या महेंद्र शेवतेला अटक

ललित पाटील ड्रग्ज (Lalit Patil Drugs) प्रकरणात ससून रुग्णालयाचा (Sassoon Hospitals) कर्मचारी महेंद्र शेवते (Mahendra Shevate) याला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे.

Lalit Patil Case

ललित पाटील प्रकरणात ससूनच्या महेंद्र शेवतेला अटक

वैद्यकीय क्षेत्रात खळबळ : ससूनमधील बडे मासे गळाला लागणार

पुणे : ललित पाटील ड्रग्ज (Lalit Patil Drugs) प्रकरणात ससून रुग्णालयाचा (Sassoon Hospitals) कर्मचारी महेंद्र शेवते (Mahendra Shevate) याला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे पोलिसानी कसून चौकशी केल्यानंतर थेट अटक करण्यात आली. शेवते याला अटक झाल्याने ससूनमधील दुसरा मासा गळाला लागला आहे. ससूनमधील आणखी बडे मासे पोलिसांच्या जाळ्यात येण्याची शक्यता आहे.

ड्रग्ज माफिया ललित पाटील ससून रुग्णालयातून उपचाराच्या नावाखाली पसार झाल्यानंतर या विषयाला वाचा फुटली होती. त्यापूर्वी ससून मधील एक कर्मचाऱ्याला ललित पाटीलचे दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन विकताना करण्यात आली होती. ललित पाटील पळून गेल्यानंतर आतापर्यंत दोन अधिकाऱ्यांसह दहा पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. यातील नाथा काळे आणि अमित जाधव या दोन पोलिसांना अटक देखील करण्यात आली होती. ललित पाटील पळून जाण्यासाठी या दोघांनी मदत केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या दोघांच्याही मोबाईल वरून ललितला पळून जाण्यास मदत करणाऱ्या दत्ता डोके याच्याशी वारंवार संपर्क साधण्यात आलेला होता.

दरम्यान, शासनाने ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना पदममुक्त केले. ससून रुग्णालयातील डॉक्टर व अधिकारी यांच्या मदतीशिवाय दलित पाटील ससून रुग्णालयातून  रॅकेट चालू शकत नव्हता असा आरोप होत होता. त्या दृष्टीने पुणे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. वार्ड नंबर १६ मधील डॉक्टर आणि नर्स वॉर्ड बॉय यांची यांचे जबाब नोंदविण्यात आले. आतापर्यंत एकूण १४ जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. त्यामधून शेवते याच्याकडे संशयाची सुई फिरली. त्याला पोलिसांनी अटक केल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्याचे आणि ठाकूर यांचे घनिष्ट संबंध होते. शेवते हाच या प्रकरणातला ससून मधीक मुख्य कर्ता करविता असल्याचे देखील पोलिसांचे म्हणणे आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest