Pune Crime News: एलएलबीचा विद्यार्थी निघाला 'घर का भेदी', पोलीसी खाक्यानंतर प्रकार उघडकीस

घराच्या उघड्या दरवाज्यावाटे आत प्रवेश करून बेडरूममधील कपाटातील आठ तोळे सोने लंपास करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा घरातलाच निघाला असून तो एलएलबीचे शिक्षण घेतो आहे.

Pune Crime News: एलएलबीचा विद्यार्थी निघाला 'घर का भेदी',  पोलीसी खाक्यानंतर प्रकार उघडकीस

एलएलबीचा विद्यार्थी निघाला 'घर का भेदी', पोलीसी खाक्यानंतर प्रकार उघडकीस

पुणे : घराच्या उघड्या दरवाज्यावाटे आत प्रवेश करून बेडरूममधील कपाटातील आठ तोळे सोने लंपास करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा घरातलाच निघाला असून तो एलएलबीचे शिक्षण घेतो आहे. त्याला पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

२५ ऑगस्ट रोजी कोंढवा भागातील एका घरामध्ये ही चोरी झालेली होती. घरातील सगळे लोक घरामध्ये असतानाच उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून कपाट उघडून हे दागिने नंपास करण्यात आल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले होते. कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल केला होता.  तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेशकुमार पाटील हे घरातील लोकांकडे चौकशी करीत होते. त्यावेळी घरामधीलच एकाने हा गुन्हा केला असावा असा त्यांना संशय आला. ज्याच्यावर संशय होता तो घरातीलच असल्याने आणि एलएलबी चे शिक्षण घेत असल्यामुळे त्याला पोलिसी खात्या दाखवणे शक्य नव्हते. त्यामुळे पाटील यांनी मानसशास्त्रीय पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला. त्याला अन्य सराईत गुन्हेगारांसोबत उभे करण्यात आले. या संशयित मुलासमोरच चौकशी करण्यास सुरुवात केली.

सराईत आरोपींना पोलिसांनी 'प्रसाद' दिल्यानंतर संशयीताला घाम फुटला. आपल्याला देखील या पद्धतीने पोलिसांचा प्रसाद मिळू शकतो, या भीतीने त्याने तोंड उघडले आणि चोरीची कबुली दिली. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप भोसले, संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेशकुमार पाटील, लेखाजी शिंदे, सतीश चव्हाण, विशाल मेमाणे, लवेश शिंदे, निलेश देसाई, लक्ष्मण होळकर, संतोष बनसोडे, ज्ञानेश्वर भोसले, सुजित मदन यांच्या पथकाने केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest